Home आरोग्य धरणगाव तालुक्यात चार रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

धरणगाव तालुक्यात चार रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

0
103

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून यात तालुक्यातील चार रूग्ण पॉझिटीव्‍ह आले आहे. शहरातील दोन तर पळधी व वाघळूद येथे प्रत्येकी एक रूग्णांचा समावेश आहे. यावृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

तालुक्यातील काही संशयित रूग्णांचे स्वॅब धरणगाव कोवीड केअर सेंटरकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील तालुक्यातील ४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. धरणगाव शहरातील बालाजी गल्ली आणि दत्तदुर्गा नगर येथे प्रत्येकी एक आणि तालुक्यातील वाघळूद आणि पाळधी येथे प्रत्येकी एक असे एकुण चार रूग्णांचा समावेश आहे. तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ५३८ झाली असून आत्तार्पंत ३१ रूग्ण मयत झालेत. तर ४१७ जण बरे होवून घरी सोडण्यात आले. आजच्या परिस्थिती ९० रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.


Protected Content

Play sound