मसूद अजहरवर बंदीसाठी चीनवर दबाव

CHINA 300x225

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पुन्हा एकदा पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढतोय. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत मसूदवर बंदी आणण्यासाठी आणलेल्या प्रस्ताववरुन अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेन यांनी चीनला तांत्रिक अडचणी हटवण्याबाबत सांगितले आहे.

 

अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेन या तीन देशांनी अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा परिषदेत प्रतिबंध समिती पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा मसूदवरील बंदीचा प्रस्ताव आणणार आहे. एकीकडे मसूद अजहरच्या प्रकरणावर चीनसोबत चर्चा केली जात आहे. येत्या २३ एप्रिलपर्यंत चीनने अजहरवर बंदी आणण्याच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, असे या देशांकडून सांगण्यात आले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या अजहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी संयुक्त परिषदेत पुन्हा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूदवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश वाऱ्यांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात.

महिनाभरापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. व्हिटो पावरचा वापर करुन चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला होता. त्यावेळी चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी नाराजी दाखवली. चीन जर या प्रकरणावर गंभीरतेने विचार करत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल असं अमेरिकेने सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे चीन काय भूमिका घेतं हे काही दिवसांत कळेल.

Add Comment

Protected Content