जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती नगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच गल्लीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने पेट्रोल टाकून दोन कार आणि एक दुचाकी पेटवून दिल्याची घटना आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास समोर आली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणपती नगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटी येथे मिलन सलामतराय तलरेजा (वय-३०) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे ऑटोपार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वर्षाच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कापड्यावर पेट्रोल टाकून कार क्रमांक (एमएच 19 डीव्ही 4193) आग लावून पेटवून दिली. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांन फोन करून कारला आग लागण्याची माहिती मिलन तलरेजा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी तातडीने धाव घेऊन आग विजाण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत या आगीमध्ये कारचे जळून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीच हे कार विकत घेतली होती. त्याच पद्धतीने त्यांच्याच गल्लीत राहणारे श्रीचंद घनश्यामदास अडवाणी (वय-४७) यांची देखील कार क्रमांक (एमएच १९ सीझेड २२७७) आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एमएच १९ डीझेड ७२४४) यांच्यावर देखील त्याच पद्धतीने डिझेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने धाव घेवून बोरींगच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.