घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या उद्देशाने शहरात फिरत असलेल्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार व चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांचे पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना अरविंद उर्फ आरु अरुण वाघोदे (वय २५,रा.सुप्रीम कॉलनी) व अनिल रमेश चौधरी (वय ४०,रा.अयोध्या नगर) हे दोघ संशयित संशयास्पदरित्या दिसले. पथकाने त्यांना थांबविले असता त्या दोघांनी याठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली.  अटक करण्यात आलेले दोघंही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.  तसेच त्याच्यावर आतापर्यंत सुमारे १० घरफोडीवरील गुन्हे दाखल आहेत. तर अनिल चौधरी याने मुक्ताईनगरात झालेल्या घरफोडीत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!