जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवनाजवळ भरधाव दुचाकी पोलीसांचे बॅरिकेटस घेऊन जाणाऱ्या वाहनावर आदळल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. दोघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाक्यावरील सद्गुरू नगरातील ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (वय-३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (वय-३६) हे दोघे भाऊ दुचाकीने सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवनाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या पुढे जाणाऱ्या दुचाकी पोलीसांचे बॅरिकेटस घेऊन जाणाऱ्या वाहनावर त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात दोघांनाही मार लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यातील ईश्वरसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आले नाही.