भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नाहाटा कॉलेज चौफुलीजवळ उघड्या विजेच्या तारांच्या धक्क्याने दोघा भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना शनिवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील जामनेर रोड वरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या कारंज्या जवळील बागेत खेळणार्या दोन सख्ख्या भावडांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवार रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. यात इंदिरा नगर येथील दीपक शंकर राखूंडे वय १० व
गणेश शंकर राखूंडे वय १३ या दोन्ही सख्ख्या भावंडांना प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच परिसराती नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना रूग्णालयात दाखल केले. मात्र आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाने दोघा बालकांना प्राण गमवावे लागल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.