जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ उधार बियर नाकारल्याच्या जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 26 जून रोजी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि गाडीच्या चावीने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी शुक्रवारी 27 जून रोजी मध्यरात्री अडीच वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी जोशी कॉलनी येथे राहणारे भूषण मोतीलाल पवार (वय ३४) यांचे गेंदालाल मिल परिसरात किराणा दुकान आहे, तर त्यांचा मोठा भाऊ शरद मोतीलाल पवार यांची मिथाली अपार्टमेंटमध्ये ‘विकास बियर शॉप’ नावाने बियरशॉपी आहे. २४ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अकिल शेख उर्फ भुऱ्या, गुलबाज शेख उर्फ मारी आणि फैजान मन्यार या तिघांनी शरद पवार यांच्या बियरशॉपीवर उधार बियर मागितली होती. शरद पवार यांनी उधार देण्यास नकार दिल्याने तिघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती
याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून, २६ जून रोजी रात्री १०.१५ वाजता भूषण आणि शरद हे आपापल्या दुकानांवरून घरी परतत असताना, शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ तिघा आरोपींनी त्यांच्या मोटारसायकली अडवल्या.
त्यानंतर भूषण पवार आणि शरद पवार या दोन्ही भावांना अकिल शेख उर्फ भुऱ्या, गुलबाज शेख उर्फ मारी आणि फैजान मन्यार या तीन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत गेली तसेच लोखंडी रॉड आणि गाडीच्या चावीने मारहाण करून दुखापत केली. दोघी भावांनी आरडा ओरड केल्यानंतर मारेकरी पसार झाले. त्यानंतर या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी असलेल्या तिघांना अटक केली.