Home क्राईम दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण गंभीर जखमी, गुन्हा दाखल

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण गंभीर जखमी, गुन्हा दाखल

0
148

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल आदर्शजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, ९ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर एकनाथ बारी (वय २९, राहणार श्रीधर नगर, जळगाव) हा त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीसी ७०३९) ने जळगावकडून मानराज पार्ककडे जात होता. त्याचवेळी हॉटेल आदर्शसमोर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी ४७५२) ने त्याला जोरदार धडक दिली.

या अपघातात सागर बारी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर सायंकाळी सात वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सत्यवान वारंगे करत आहेत.


Protected Content

Play sound