जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गांधी मार्केट जवळ तरूणावर चाकूने वार करून त्याच्याजवळील चैन चोरून नेणाऱ्याप्रकरणी १४ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीसांनी उमेश दत्तात्रय धोबी उर्फ दोध्या रा. पिंप्राळा व भूषण मनोज अहिरे रा. कालंका माता मंदिर, जळगाव यांना अटक केली आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील शोएब तस्लीम खान (वय २६) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकामचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता तो कामाच्या निमित्ताने शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे एकुण तीन जणांनी रस्ता आडवून चॉपरने पोटावर वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या जवळून ४ हजार रूपये किंमतीची चांदीचे चैन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १६ एप्रिल रोजी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे संशयित फरार होते.
शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सुनिल पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, अमेाल ठाकूर, तेजस मराठे, रतन गिते, सुधीर साळवे, योगेश पाटील यांनी उमेश दत्तात्रय धोबी उर्फ दोध्या व भूषण मनोज अहिरे यांना मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पिंप्राळज्ञ परिसरातून अटक केली आहे.