मोटर वाहन निरीक्षकाला शिवीगाळ केल्याने दोघांना अटक

crime bedya

रावेर, प्रतिनिधी | आरटीओ चेक पोस्ट चोरवड येथिल मोटर वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.

रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आटीओ कार्यालयात कार्यरत असलेले मोटर वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे यांची रावेर तालुक्यातील आरटीओ चेक पोस्ट चोरवड येथे हल्ली ड्यूटी आहेत. ते चेक पोस्ट येथे कार्यरत असतांना चोरवड येथील किरण ब्रिजलाल पाटील (वय २७ वर्ष) व योगेश सुरेश रजाने (वय ३४ वर्ष) यांनी त्यांना आम्हाला तुम्ही नोकरीवर ठेऊन घ्या असे सांगितले. याला उत्तर देतांना निरीक्षक अहिरे यांनी त्यांना सांगितले की, नोकरीवर ठेवण्याचा त्यांना अधिकार नाही. हे ऐकताच किरण व योगेशने मोवानि अहिरे यांना शिवीगाळ करून तुम्ही कसे ड्यूटी करता पाहून घेऊ अशी धमकी देऊन अहिरे यांना धक्काबुक्की केली. त्या दोघानी सरकारी कामात अडथळा निर्माण करून शांतता भंग केल्याने रावेर पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली. आरोपींची वैदयकीय तपासणी केली असता ते दारू पिले होते आढळून आले आहे.

Protected Content