चाळीसगाव येथील माजी नगरसेवकाचा खून केलेल्या दोन आरोपी अखेर जेरबंद

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२० (ब),१४३,१४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ प्रमाणे दाखल गुन्हयांतील आरोपींनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर ७ फेब्रुवारी रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर सदर फायरिंग करणारे आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, तसेच अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभाग यांनी किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.११/०२/२०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, १) सचिन सोमनाथ गायकवाड रा. घाटरोड, चाळीसगाव ता, चाळीसगा, जि. जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना/राहुल जितेंद्रसिंग पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर आरोपीतांचा लोणीकंद परिसरात पिंजून काढून १) सचिन सोमनाथ गायकवाड वय २३ रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि.जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख वय २३ रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव यांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर कारवाई करतांना पोहेकों/अक्रम शेख याकुब, पोहेकॉ महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, पोहेकों/शिवदास नाईक, पोना/हेमंत पाटील, पोना/किशोर मोरे, पोकों/ईश्वर पंडीत पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. वरील आरोपीतांना चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२०(ब), १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ या गुन्हयांत पुढील तपास कामी ताब्यात दिले आहे.

 

Protected Content