पिंप्राळा येथील विवाहितेचा १५ लाखासाठी छळ; पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या ३१ वर्षीय विवाहितेला माहेरहून प्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये आणावे यासाठी पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भारती चंदुलाल तायडे (वय-३१) रा. पिंप्राळा हुडको यांचा विवाह २०१७ मध्ये चंदूलाल नामदेव तायडे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या १५ दिवसानंतर पती चंदुलाल तायडे याने लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मला फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन १५ लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैशांची पूर्तता करू शकत नसल्याचे सांगितल्यावर पती चंदुलाल तायडे याने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सासू, सासरे, दीर व नणंद यांनीदेखील पैशांसाठी टोमणे मारणे व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. बुधवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती चंदुलाल नामदेव तायडे, सासरे नामदेव शंकर तायडे, सासू भिकाबाई नामदेव तायडे, दीर प्रकाश नामदेव तायडे सर्व रा. नगरदेवळा ता. पाचोरा आणि नणंद भारती संजय नरवेलकर रा. पुणे या पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

Protected Content