पिंप्राळा हुडको खून प्रकरणातील फरार दोन संशयीतांना अटक; रामानंद नगर पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयित राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे (वय-२१) व शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे (वय-२६), दोन्ही रा.बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको) हे दोघे कानळदा रस्त्या वरील बडे जटाधारी बाबा मंदिर परिसरातून रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आता एकूण नऊ जण अटक झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुकेश रमेश शिरसाठ या तरुणावर रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी कोयत्याने वार करुन त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. तर दोण जण फरार झाले होते. या संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुप्त माहिती मिळाल्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक फौजदार संजय सपकाळे, हवालदार इरफान मलिक,हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार व जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने कानळदा रोडवरील शेतात लपून बसलेल्या राहुल ऊर्फ प्रेम सोनवणे व शैलेश ऊर्फ पंकज सोनवणे यांच्या मुसक्या आवळल्या.

राज्याकडून पोलिसांवर ओढले ताशेरे !
ऑनकिलरची घटना राज्याला हादरवणारी घटना आहे. याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. विधानसभेचे उपसभापती नीलम गोरे यांनी पोलिसांवर ताशेरे ओढत या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यापूर्वी मयत आणि मयतांच्या नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. परंतु या तक्रारीवर पोलिसांनी काय कारवाई केली. यासंदर्भातला अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयात सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले आहेत.

Protected Content