जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धरणगाव अहिरे खू ॥ येथील तुकाराम शंकर पाटील (वय-८५) यांचे अल्पशा आजाराने आज रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले आहे. उद्या (दि.२०) रोजी सकाळी १० वाजता त्यांची अत्यंयात्रा राहत्या घरातून काढण्यात येणार आहे.
तुकाराम शंकर पाटील यांच्या पश्चाात दोन मुले, दोन मुली आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांचे ते आजोबा होत.