जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ आज सुसाईड नोट लिहत आजारपणाला कंटाळून एका वृद्धाने नस कापून जीवन संपविण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.
आजारपणाला कंटाळून सूसाईट नोट लिहीत वृद्धाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे (वय-७२) हे वृद्ध वास्तव्यास आहे. पांडे हे सोमवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील बाकावर बसलेले होते. याचवेळी त्यांनी सूसाईट नोट लिहीत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन घेतले. ही घटना उद्यानातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे संजय बडगुजर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुरेश पांडे यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
घटनेनंतर पोलिसांनी पांडे यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन त्यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, त्यांचा मुलगा हा जिल्हा रुग्णालयात आला असता, पांडे हे मनोरुग्ण असून त्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुरेश पांडे यांनी सुसाईट नोटमध्ये, “मा. एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करीत आहे. यात कोणी दोषी नाही मला ९० टक्के दिसत नाही. आजाराला कंटाळला आहे. मी स्वत: जबाबदार आहे धन्यवाद.” असे त्यांनी सूसाईट नोटमध्ये नमूद केले आहे.