जळगाव प्रतिनिधी | शहरातून रोज कॉलेजला जातांना व तसेच शहरात परत येतांना असंख्य खड्ड्यांचा सामना करावा लागतो, त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे बांभोरी पुलाचे एका रात्रीत डांबरीकरण करण्यात आले, त्यानिमित्त त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित त्रिमूर्ती बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
वाहतूकीतून बांभोरी पुलावरून प्रवास करताना १० मिनिटे ते अर्धा तास वेळ लागायचा, त्या वेळेची बचत होईल, तसेच जळगाव ते कॉलेज हा प्रवास सुखकर होईल, म्हणून ज्याही कोणाच्या प्रयत्नांतून बांभोरी पुलाचे डांबरीकरण झाले असेल, त्या सर्वांचे शतशः आभार प्राचार्य हर्षल तारे यांनी मानले. प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्रिमूर्ती फार्मसीचे ऑफिस सुपरिटेंडेंट जुगल पाटील, प्रा. बाळकृष्ण बाहेती, अश्विनी पाटील, लोकेश बरडे, स्वप्नील देव, स्वाती येवले, महेश हराळे, समीर तडवी, उमेश महाजन, रिया शेख, अमोल चौधरी, योगेश चौधरी, अजिंक्य जोशी, मयुरी डी. पाटील, मयुरी के. पाटील, सचिन जाधव, भुरसिंग पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मनोज पाटील यांनी कौतुक केले.