बसच्या धडकेत ट्रकचालक जखमी; गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील हॉटेल आमंत्रण समोर ट्रक जात असतांना भुसावळ करून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.  या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारात हॉटेल आमंत्रण समोर ट्रक क्रमांक ( एमपी ०५ जी ६९६२) हा आयुध निर्माणी वरणगावकडे जाण्यासाठी रस्ता पार करत असतांना भुसावळ कडून येणारी बस क्रमांक (एमएच १४ बीटी ४०१५) ने जोरदार धडक दिली. त्या धडकेत बस व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. ट्रक चालक संतोष रामस्वरूप यादव (वय-४२) रा. इटारसी, मध्यप्रदेश याने वरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात बस चालक भगतसिंह फुलचंद डुमाले (वय-५१) रा. शिवगाव, ता. वैजापूर जि.औरंगाबाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नविद अली सादीक अली सैय्यक हे करीत आहे.

Protected Content