नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांवर कुऱ्हाड

 

modi 17

 

पुणे (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी होणाऱ्या सभेसाठी पुण्यात झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदींची ही सभा पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात पार पडणार आहे. प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरु केली असून यावेळी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचे उघड झाले आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचे काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास २० ते २५ झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान आयोजकांनी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

Protected Content