यावल येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण

यावल प्रतिनिधी । डॉ. नानासाहेब धर्माधिकारी  व नारायण धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ सातोद मार्गावरील नवीन प्रशासकी ईमारतीच्या तहसील कार्यालयात व यावल पंचायत समितीच्या आवारात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावल येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील, तहसीलचे कर्मचारी संतोष पाटील, त्याचप्रमाणे यावल पंचायत समितीच्या आवारात पंचायत समितीचे कक्ष अधिकारी जी एम रिंघे यांच्या हस्ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णु धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम २०२१ अंतर्गत विविध जातीचे सुन्दर अशी पन्नास वृक्षांची वृक्षारोपण यावेळी करण्यात आलीत.

याप्रसंगी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य राम शिंदेसर, प्रभाकर पाटील, संतोष नारेकर, पंकज कोलते, अरूण धांडे, राहुल बडगुजर यांच्यासह प्रतिष्ठानच्या सुमारे २५ सदस्यांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन यावल तालुक्यात अशा प्रकारे विविध ठीकाणी वृक्षरोपणाचे कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी सांगीतले.

Protected Content