शिंदाड येथील प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

पाचोरा प्रतिनिधी । शिंदाड ता. पाचोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेत आज (दि.२९) रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

येथील शाळेत पिंपळगाव- शिंदाड गटाचे जि. प. सदस्य मधुकर काटे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, माजी सरपंच कैलास पाटील यांचे हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली यावेळी यावेळी मधुकर पाटील, नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त  करून वृक्ष संगोपन करण्यासाठी व शाळेत शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्वतो परी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी माजी उपसरपंच हिलाल पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकिल तडवी, समाधान पाटील, जनाबाई पाटील, कांचन परदेशी, इंदल परदेशी, धनराज पाटील, श्रीकांत पाटील, दशरथ पाटील, विजय पाटील, बापू पाटील, विनोद तडवी, मुख्याध्यापक मीना नेहरकर, प्रशांत पाटील, जितेंद्र जगताप, विजय पाटील, विनोद महालपुरे, दीपक साळुंखे, निलेश देशमुख, संगीत पाटील, यामिनी पाटील, सरला वाघ आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!