जळगाव प्रतिनिधी । पर्यावरण पंधरवाडा निमित्ताने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भाजपा महानगरतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण व आपट्याचे रोपे वाटप घेण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, आज शुक्रवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भाजपा जिल्हा महानगरतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण आणि आपट्याची झाडांची रोपे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी पर्यावरण व वृक्ष संवर्धन हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. यासंगी भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राष्ट्रीय पर्यावरणी समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण मित्र डॉ. काबरा, जिल्हा सरचिटणीस डॉ, राधेश्याम चौधरी, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, नगसेविका दिपमाला काळे, शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अन्ना पाटील, जिल्हा संयोजक मनोज भांडारकर, मंडळ ४ चे अध्यक्ष केदार देशपांडे, सह प्रसिद्धी प्रमुख धीरज वर्मा, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष हेमंत जोशी, ललित लोकचंदाणी, विवेक जगताप, चेतन तिवारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी चेतन खैरनार, राजेंद्र सोनवणे, अश्फाक शेख, प्रमोद वाणी, सुरेश सोनवणे यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला.