जामनेरात ‘हलगट’ चित्रपटाचे लोकार्पण

जामनेर प्रतिनिधी । जामनेर येथील बाबाजीराव मंगल कार्यालयात मोठ्या थाटात बाबुराव घोंगडे निर्मित हलगट चित्रपटाचे लोकार्पण सोहळा पार पडला.

आज हलकट चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता बाबुराव घोंगडे यांनी ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपटात घेऊन एक संधी उपलब्ध करून दिली असून त्यामुळे मोठा फायदा होणार आहे. आम्ही राजकारणी सुद्धा एक कलाकार आच असून आम्हाला वेगवेगळ्या भूमिका बजावायला लागतात. अशी प्रतिक्रिया हलकट चित्रपट पोस्टर लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प. सदस्य अमित देशमुख, जि.प. सदस्य विलास पाटील, गोविंद अग्रवाल, नवल पाटील, रामेश्वर पाटील, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, उपसभापती पती भडांगे, मार्केट कमिटी सभापती संजय देशमुख, राजधर पांढरे, चित्रपट दिग्दर्शक करण अर्जुन, चित्रपटातील कलाकार व नागरिक या हलकट चित्रपट पोस्टर अनावरण प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Protected Content