बोढरे गावात ध्वजारोहणानिमित्त वृक्षारोपण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे गावात २६ जानेवारी या दिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण जेष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. 

गावात वृक्षारोपण उपक्रम राबविला जावा. यासाठी अनेक दिवसांपासून गावातील तरुणांनी कंबर कसली होती. शेवटी २६ जानेवारीला तो मुहूर्त ठरला. व पन्नास झाडांची वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी पहिला वृक्षारोपण गावातील जेष्ठ नागरिक हासराज आनंदा राठोड (वय-६२ अंदाजे) यांच्या हस्ते करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अमित पटेल यांनी मोफत पन्नास झाडांची मदत केली. याबद्दल गावात सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच भविष्यात पटेलांनी आम्हाला आणखीण  झाडांची मदत करावी अशी प्रतिक्रिया ही ग्रामस्थांनी उमटविली. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावकऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी उपस्थितांची संख्या ही लक्षणीय होती. ग्रामस्थांबरोबर ग्रामपंचायत पदाधिकारी , कर्मचारी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. जितेंद्र परदेशी यांनी अंडा सुरक्षित राहण्यासाठी अशी अंडा उबनी यंत्र शाम निकम यांना भेट दिली. 

त्या यंत्रामध्ये एकविस दिवस अंडा सुरक्षित राहून पिल्लं बाहेर पडतात. हा यंत्र कुक्कुटपालन साठी उपयुक्त आहे. किंबहुना व्यवसायाला चालना देण्यासाठी हा यंत्र साधन आहे. कृषी सहायक तुफान खोत यांच्या प्रयत्नातून हे झाडे वनपरिक्षेत्र अधिकारी पटेल यांनी मोफत दिले. त्यामुळे खोत यांचा या उपक्रमात खारीचा वाटा आहे. तरूण यांच्या प्रयत्नातून हे उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

Protected Content