चोपडा प्रतिनिधी । कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली, भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रंसगी माजी आमदार डॉ.सुरेश जी. पाटील व जनशिक्षणाच्या अध्यक्षा डॉ.स्मिता पाटील, स्नेहा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. जनशिक्षण संस्थानचे संचालक रविंद्र कुडाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदिप सोनवणे, किर्ती पाटील, शशिकांत साळुंखे, विकास भदाणे, गौरी देशमुख, स्मिता पोळ, अनिता चौधरी, विद्या सोनवणे व सतिष बारेला यांनी परिश्रम घेतले.