चोपडा महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

chopada 2

 

चोपडा प्रतिनिधी । येथील म. गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात विविध स्पर्धा आणि परिक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते एम.कॉम परीक्षेत 75.69% गुण मिळवून सी.ए. परीक्षेतील आयपीसीसी गृप उत्तीर्ण झाल्याबद्दल स्नेहा साखला, युवा संसद अंतर्गत पं.स.चोपडा तर्फे आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या भाग्येश सोनवणे, संगमनेर येथे इन्स्पायर कॉम्पसाठी निवड झालेले प्रथमेश कोठावदे, मयूर पाटील व सचिन भारती व स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त प्रणिती महाजन व गृप आदिंचा गौरव यावेळी करण्यात आला. अभ्यासाइतकेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर होत असते. असे मत संस्थेचे सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी मांडले. प्रास्तविक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी.आर. देवरे यांनी तर उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय पाटील, प्रा.एन.बी शिरसाठ, प्रा.पी.आय.जैन, प्रा. किशोर राजपूत, मनिष देसले आदिसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content