Home Cities पारोळा एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पारोळा बसस्थानकात वृक्षारोपण

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पारोळा बसस्थानकात वृक्षारोपण

0
7

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पारोळा बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. परिवहन विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिष पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुदाम चौधरी, माजी शहरप्रमुख बापू मिस्तरी, मोहाडीचे माजी सरपंच रामचंद्र पाटील, नगरसेवक मनोज जगदाळे, राजूभाऊ कासार, प्रमोदशेठ कासार, विनोद पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक विवेक पाटील, नजीरखान बेलदार, युवा सैनिक अमोल पाटील यांच्यासह बसस्थानक परिसरातील व्यावसायिक, पारोळा आगाराचे व्यवस्थापक सतीश सातपुते, चालक, वाहक आणि परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी स्थानिक वातावरणाशी सुसंगत व दीर्घकाळ टिकणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संरक्षणाची सातत्याने जपली जाणारी जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, या संदेशासह “एक वृक्ष लावा… पर्यावरण वाचवा, भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा द्या!” हा संदेश यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound