एरंडोल प्रतिनिधी । येथे नगरपालिकेतर्फे पीएम स्वनिधी “मै भी डिजिटल” या मोहिमेअंतर्गत पठा विक्रेत्यांना डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. डिजिटल साधनांचा वापर केल्यावर पथ विक्रेत्यांना कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त कॅश बँक प्राप्त होणार आहे.
एकूण 33 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक हिपी जावरे , रवी कुमार मिष्रा यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील समुदाय संघटक कुसुम पाटील यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख हे उपस्थित होते.