पाचोरा प्रतिनिधी । जोरदार पावसामुळे शहरातील नवगजा पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेले दोन्ही रस्ते वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले वाहून निघाले आहेत. तालुक्यात सर्वात मोठ्या असणार्या बहुळा प्रकल्पातील पाणीसाठी वाढल्यामुळे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे शहरातील नवगजा भागातील पुलासाठी तयार करण्यात आलेले दोन्ही रस्ते वाहून गेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. यामुळे चाळीसगाव, जळगाव व जामनेर आदी भागांकडे जाणारी वाहतून विस्कळीत झाली असून संपर्क तुटला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बहुतांश जलसाठे तुडंब भरलेले असल्याने गणेशभक्तांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी केले आहे.