जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल मानसजवळ असलेल्या चौधरी बॅटरी ट्रेंडींग दुकान फोडून ४१ हजार रूपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना १८ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी १९ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हॉटेल मानसजवळ अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी वय ४७ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांचे चौधरी बँटरी ट्रेडींग नावाचे दुकान आहे. १७ ते १८ मे दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर वाकवून आत प्रवेश करत दुकानातून वेगवेगळ्या कंपनीच्या ४१ हजार रूपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अब्दुल्ला चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढीलतपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.