शिवकॉलनी परिसरातून अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक ट्रॅक्टर रामानंदनगर पोलीसांनी पकडले. याप्रकरणी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी शिवकॉलनी परिसरात गस्तीवर असतांना (एमएच १९ एलएन ३६०३) क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करतांना आढळून आले. पोलीसांनी वाळूचे ट्रॅक्टर आडविले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस नाईका जितेंद्र तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विठ्ठल पांडूरंग थोरात रा. सावखेड बुद्रुक जि.जळगाव याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल विकास महाजन करीत आहे.

Protected Content