सत्ताधारी आणि विरोधक भिडले : अभूतपुर्व राडा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधीमंडळ अधिवेशन अंतिम टप्प्यात आले असतांना आज विधीमंडळाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडल्याने अभूतपुर्व राडा झाल्याचे दिसून आले.

आज विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘कोविडच्या भीतीने राजा बसला घरी’, ‘वाझेचे खोके- मातोश्री ओके’, ‘लवासाचे खोके-बारामती ओके’, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘पन्नास खोके एकदम ओके’ अन् ‘खावून खावून माजलेत बोके!’ ‘गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, विधिमंडळाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये वाद झाले. यात शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, असे ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असा इशाराच त्यांनी दिला. तर अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी महेश शिंदे यांनी पातळी सोडून शिवीगाळ केल्याचा आरोप केला. राज्य सरकारने विधीमंडळात राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी दिली.

Protected Content