Home क्राईम जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
103
crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात पंधरा दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या 2 ट्रॅक्टर व 1 डंपर पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पळविलेले डंपर पोलीसांनी कारवाई करून जप्त करण्यात आले.

महसूल विभागाच्या पथकाने जप्त करून आणलेले डंपर, टॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. यातील दोन टॅ्रक्टर मागील १५ दिवसांपूर्वी वाळूमाफियांनी दंड न भरता परस्पर पळवून नेल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीसात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे, प्रशांत जाधव, अविनाश ठाकरे, नाना तायडे, उमेश पाटील यांनी गस्तीदरम्यान विना क्रमांकाचे हे ट्रॅक्टर हरिविठ्ठल नगरातून ताब्यात घेतले. तसेच एमएच १९ झेड ४५४८ हे डंपर देखील ताब्यात घेण्यात आले.यावेळी मालक व चालक हे दोघे पोलीस पाहून पळ काढला अाहे.


Protected Content

Play sound