जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदार संघ मिळून ३८८६ मतदार केंद्र आहेत.
त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९८२ मतदार केंद्र आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात १९०४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात एकूण २१ दिव्यांग मतदार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर ३३ महिला मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. जिल्हयात एकूण ११ युवा मतदान केंद्र तर ५५ आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण ३८८६ मतदान केंद्र
8 months ago
No Comments