चोरीच्या सात दुचाकींसह संशयित आरोपीला अटक; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला गुरूवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीसांनी अजिंठा चौकातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. संशयित आरोपीवर वेगवेगळ्या स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहे. राकेश पंडीत भाट (वय-२४) रा. मोठे वाघोदे ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने जिल्हा पेालीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. दरम्यान, सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे संशयित आरोपी हा जळगाव शहरातील संशयित आरोपी अजिंठा चौकात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून संशयित आरोपी राकेश भाट याला अटक केली. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्याने सात ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी राकेश भाट याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ असे एकुण ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठे, पोकॉ रविंद्र साबळे आणि तुषार पाटील यांनी ही करवाई केली.

Protected Content