Home धर्म-समाज रावेर तालुक्यात ढगफूटी पावसाचा कहर; दोन जणांचे मृतदेह मिळाले

रावेर तालुक्यात ढगफूटी पावसाचा कहर; दोन जणांचे मृतदेह मिळाले

0
71


अद्याप एक बेपत्ता, दहा जनावरेही दगावली: शकडो घरांची पडझड

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर ढगफूटी पाऊस झाल्याने रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुर आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता पर्यंत २ जणाचे मृत्युदेह सापडली असुन एक जणांचा शोध सुरु आहे. तर आतापर्यंत दहा गुरे दगावली असुन शंभरच्या वर घरांची पडझड झाली आहे.

मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर पर्वतामध्ये ढगफूटी सदृश्य झाली असल्याने रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुर आल्याची प्राथमिक माहिती आहे. सिमेवर पावसाचा जोर इतका होता कि रावेर तालुक्यातील सुकी धरण, मंगळुर धरण, आभोळा धरण पहीलाच्या पावसात ओव्हरफ्लो झाली. रावेर तालुक्यातील रावेर-जूना सावदा रोडवरील नागझिरी नदीच्या पुलावरुन पाणी होते म्हणून बंद होता.उटखेडा-कुंभारखेडा सुकी नदीच्या पुलावरुन पूरावरुन मोठ्या प्रमाणात पाणी होते म्हणून हा देखिल पुल वाहतुकीसाठी बंद होता. रावेर तालुक्यात पडलेल्या पावसा संदर्भात हतणुर धरणाचे उपविभागीय अभियंता श्री चौधरी सांगतात, एकाच रात्री एवढ्यामोठ्या प्रमाणात पाऊस पड आणि एकाच पावसात धरणे ओव्हरफ्लो होतात, एखाद्या वेळेस मध्यप्रदेश, महाराष्ट्र सिमेवर ढग फुटीसदृश्य पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

ढगफूटी सदृश्य पावसाने झाली मोठी हानी
मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर पर्वतामध्ये ढगफूटी सदृश्य पाऊस कोसळल्याने अनेक नदी-नाल्यांना पाऊस आला यामध्ये रावेर शहरातील शेख इकबाल शेख सत्तार याचा नागझिरी नदीत मृत्युदेह आढळला तर दुसरा मोरव्हाल येथील बळीराम रायसिंग बारेला याचा अभोडा नदित मृत्यु देह सापडला आहे.तर अजुन एकाचा शोध सुरु आहे.


Protected Content

Play sound