जळगाव, प्रतिनिधी | उद्या दसऱ्याच्या शुभमुहर्तावर मंगळवार ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता ग्राम दैवत श्रीराम मंदिर (जुने जळगाव) येथून महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- शिवसेना – रासप – आरपीआय (आ.) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांचा विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहूर्तावर जळगाव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर देवस्थान रथ चौक येथून मंगळावर दि.८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वा. प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रचार नारळ वाढून होणार आहे. प्रचार शुभारंभप्रसंगी जलसंपदामंत्री जिल्हा पालकमंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, ना. हरिभाऊ जावळे, ना गुरुमुखजी जगवणी, ना. उज्वला पाटील, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, खा. उन्मेश पाटील, खा. रक्षा खडसे, आ. चंदूभाई पटेल, आ. स्मिता वाघ, आ. संजय सावकारे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, रिपाई (आ.) जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेना गटनेते अनंत जोशी तसेच नितिन लढ्ढा, भाजपा उपगट नेते, राजेंद्र घुगे पाटील,, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, मनपा प्रभाग सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, रंजना वानखेडे , सुरेखा सोनवणे, विजय पाटील, बजरंग दलचे ललित चौधरी, आरपीआयचे रविंद्र सपकाळे, अनिल अडकमोल, नंदा बाविस्कर, रासपचे लखन हटकर व सर्व महायुतीचे नगरसेवक, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, प्रभाग समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, भाजपा, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थित जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी ठीक दुपारी ४:०० वा श्रीराम मंदिर संस्थान जुने जळगाव रथ चौक येथे हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, व प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारक, महेश ठाकूर यांनी केले आहे.