मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आमदार अबू आझमी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली त्याचाच परिणाम म्हणून चारशे पार चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्ष केवळ २४० जागा मिळवू शकला.
ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही समाजवादी पक्षाचा मतदार आहे. आगामी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र मध्ये पक्ष १२ जागांवर उमेदवार उभे करणार आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाची ताकद आहे. आम्ही हडपसर मतदारसंघात उमेदवार उभा केल्यास निश्चितच समाजवादीचा आमदार निवडून येईल.