यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या जाती राष्ट्रपतींच्या यादीमध्ये अनुसुचित जमाती आहे. मात्र महाराष्ट्रातील राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी अनु. जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करुन आमच्या हक्कापासून वंचित ठेवत असल्याची तक्रारी जि. प. गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी विविध समस्या बाबत समोरासमोर चर्चा केली. यावेळी जळगाव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तोंडी आदेश देऊन अनु. जमाती जात प्रमाणपत्र व वैद्यता जातप्रमाणपत्राबाबत होणारा अन्याय दूर करण्यात याव्या असे आदेश दिले असता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकर मिटिग लावण्याबाबत कळविण्यात येईल असे सांगितले.
दिवासी भागात विविध योजना व मुलभुत कांमाना नीधी देताना आम्हाला गृहीत घरुन दिला जातो मात्र प्रत्यक्षात लाभ देताना घटनेने दिलेल्या अधिकार पासून वंचित ठेवले जात आहे. महाराष्ट्रात मोर्चा, धरणे आंदोलन व उपोषण सुरु असून अधिकारी थातूरमातूर आश्वासन देऊन तुमचा प्रशन सोडविला जाईल असे सागुन नंतर जैसे थे वागतात अनु. जमातीच्या विविध लाभ पासून वंचित ठेवत आहे.
आदिवासी विभागाचा निधी हा कमी प्रमाणात मिळतो आणि मिळाला तार खर्च होत नाही खर्च न झालेला निधी दुसरीकडे वर्ग केला जात असून येथील आदिवासी बांधव यापासून वंचित राहत आहे विद्यार्थ्यांना विविध दिलेल्या सवलती दिल्या पाहिजे. मात्र त्या दिल्या जात नसल्यामुळे त्यांचा परिणाम आदिवासीच्या उन्नती व प्रगतीवर होत असून आदिवासी जानतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण लक्षघालावे अशी मागणी माजी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनजी यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकारला याबाबत निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.