यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा येथील ३३ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीला आली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील (वय-३३) रा. मोहराळा ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील हा आपल्या आई व भावासह वास्तव्याला होता. त्याला एका दुर्धर आजाराने ग्रस्त होता. रविवारी १३ ऑगस्ट रोजी त्याची आई शेतात कामाला गेली. त्यावेळी तो घरी एकटाच होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी त्याची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आल्याने तिने एकाच हंबरडा फोडला. दरम्यान मयत भोजु पाटील यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. मयताचे भाऊ यशवंत पाटील राहणार यावल यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .