तृणमूलचे ३ आमदार आणि ५० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

D7pfSNZUEAEw9jX

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला असून पक्षाच्या ५० नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही आज नवी दिल्लीत भाजपात प्रवेश केला.

 

प. बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. प. बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूलचे दोन आमदार आणि ५० नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. दिल्लीत या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. २०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झालेले तृणमूलचे माजी नेता मुकुल रॉय यांचे सुपूत्र शुभ्रांशु रॉय यांच्यासह तीन आमदार भाजपत गेले. एक आमदार सीपीएमचे आहेत. शुभ्रांशु रॉय बीजपूरचे आमदार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त विष्णुपूरचे तृणमूलचे आमदार तुषार कांती भट्टाचार्य, हेमताबादचे सीपीएमचे आमदार देवेंद्र रॉय यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील आमदार भाजपात जात असल्याने पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात तृणमूल विरुद्ध भाजपा हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल काँग्रेसचे ३० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. दरम्यान, काचरापारा महानगरपालिकेचे १७ नगरसेवक भाजपत सामील झाले आहेत. परिणामी या २६ नगरसेवकांच्या महापालिकेत भाजप सत्तेत आला आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन महापालिकांवर भाजपने कब्जा केला आहे. तीन्ही महापालिकांचे मिळून ५० नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे.

Add Comment

Protected Content