कर्नाटकातील पुतळा पुन्हा बसवा; रावेरात मागणी (व्हिडीओ)

रावेर (प्रतिनिधी) । कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा हटविल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल व पोलिस प्रशासन यांना निवेदन देऊन कर्नाटक सरकारने पुतळा त्याच जागेवर बसवण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला असुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर बसविण्याची मागणी केली आहे. रा.यु.कॉ.जिल्हाकार्याध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष महेमुद शेख ,प्रणित महाजन, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, रा.कॉ. विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव महाजन, शुभम मराठे, शुभम पाटील, निशिकांत बिंबे, विक्रांत मराठे, सोनल महाजन, आकाश चौधरी, धनराज महाजन, सुयोग पाटील, बंटी लोखंडे, प्रशांत चौधरी, नयन अत्तरदे, गणेश देवगिरीकर, नितीन पाटील, जितेंद्र साबळे, चेतन पाटील, अमोल पाटील, कुणाल महाले, विकास पाटील, योगेश पाटील, श्रीराम पाटील, भूषण पाटील, हर्षल महाजन, प्रशांत पाटील, रितीक कोळी, प्रशांत पाटील, आकाश पाटील, चिंतन आसेकर, कुणाल सपकाळे, सुयोग पाटील, योगेश पाटील, भूषण पाटील, किशोर पाटील, किरण पाटील, राहुल पाटील आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=303918527689071

Protected Content