अंडा भुर्जीची गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा शॉक लागून मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात अंडा भुर्जीच्या गाडीवर आवराआवरी व ती सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथे आज पहाटे ३ च्या सुमारास घडली.

अभिषेक अजय घाणेकर, आकाश विनायक माने, शिवा जिदबहादुर परिहार अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. पुण्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खकडवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असून यामुळे मुठा नदीला मोठा पुर आला आहे. काल रात्री मोठा पाऊस आल्याने तिघांनी त्यांची अंडा भुर्जीची गाडी बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, पहाटे ३ वाजता पाणी वाढल्याने ही गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ते तिघेही पुन्हा गाडीवर गेले. यावेळी तेथे गुढघाभर पाणी साचले होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा शॉक बसला. यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

खडकवासला धरण परिसरात पाऊस झाल्याने धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मूठ नदीला पुर आला आहे. पूलाची वाडी येथील नदी पात्राजवळ तिघांची अंडा भुर्जीची गाडी होती. काल रात्रीपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गाडी शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे पहाटे ३ च्या सुमारास पाण्यातील गाडी काढण्यासाठी हे तिघेही गेले होते. यावेळी अचानक पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांनाही विजेचा जोरदार झटका बसला. यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. येथील वीज प्रवासह बंद करून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिन्ही तरुणांना डॉक्टरांनी आज रोजी पाहते पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडी कोसळली आहेत. यामुले विद्युत तारा देखील काही ठिकाणी तुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची उपकरणे काळजी पूर्वक हातळावी व तारा तुटलेल्या परिसरात व पाण्यात उतरू नये असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Protected Content