आर.एल.चौफुलीवर साडेचार किलो गांजा हस्तगत; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव ते औरंगाबाद रोडवरील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या आर.एल. चौफुलीवर मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एकजण विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्यात. पोलीसांनी कारवाई करत हातात पाकीट घेवून गांजाची विक्री करतांना संशयित आरोपी बबलू उर्फ टारझन अरूण दहेकर (वय-३२) रा. जाखनीनगर कंजरवाडा जळगाव आढळून आला. त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा ४ किलो ४८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांनी कारवाई केली.

 

Protected Content