आकाशवाणी चौकातील तीन मेडीकल फोडले; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील एकाच रांगेत असलेल्या अपेक्स मेडीकल, विनोद मेडीकल आणि विवेकानंद नेत्रालय अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह किरकोळ वस्तू लंपास केल्याचे आज रविवारी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. तवेरा कारसह तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अपेक्स हॉस्पिटलमधील अपेक्स मेडीकल दुकानाजवळ २० जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मध्यरात्री तवेरा कारमध्ये अज्ञात तिघेजण आले. कटरच्या सहाय्याने मेडीकलचे शटर उचकावून गल्ल्यातील ८ ते १० हजार रूपयांची रोकड लांबविली. त्यानंतर दुसऱ्या घटनेत त्याच रस्त्यावर असलेले विनोद हॉस्पिटलच्या मेडीकल जवळ ४ वाजून ३५ मिनीटांनी तवेराने चोरटे आले. त्यांनी हॉस्पिटलसमोर कार उभी केली. तिघांपैकी पहिला चोरटा तोडला रूमाल आला. हॉस्पिटलच्या वाल कम्पाऊंडच्या भिंतीवरून उडी घेतली. त्यानंतर दुसरा साथीदार कटर घेवून कम्पाऊंडजवळ आला. तो देखील कम्पाऊंडमध्ये उडी मारून मेडीकल समोर आले. लोखंडी टॉमीच्या मदतीने शटर उचकविण्याचा प्रयत्न करीत असतांना विनोद हॉस्पिटलमध्ये रात्र पाळीसाठी असलेले सुरेश राऊत यांनी चोरट्यांच्या हालचाली लक्षात आल्या. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता दोन चोरटे लोखंडी टॉमी आणि कटर घेवून पळ काढतांना दिसून आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तर तिसऱ्या घटनेत विवेकानंद नेत्रालय हॉस्पिटल येथील मेडीकल फोडून पाण्याच्या बाटल्या लांबविल्या आहे. याप्रकरणी अपेक्स हॉस्पिटलचे मालक पारसमल मुलतानमल जैन यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Protected Content