नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजधानी दिल्लीमधून दहशतवादी संघटना आयएसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरु आहे. या दहशतवाद्यांनी दिल्लीमध्ये कसा प्रवेश केला याचा तपास सुरु आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, वजीराबादच्या चकमकीनंतर तिघा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत आयएस या दहशतवादी संघटनेच्या मोड्यूलचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. तिघांना पकडण्यात आले आहे. हे तिघेही आयएसचे संशयित दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे.