जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीसीटीव्ही चेक करण्याच्या कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसी हद्दीतील प्रभात रेस्टॉरंट येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, “महेश विष्णू मोरे रा. रिंगरोड जळगाव यांचे एमआयडीसी हद्दीतील सर्वोदय पेट्रोल पंपाच्या बाजूला प्रभात रेस्टॉरंट आणि भरती सेंटर नावाचे दुकान आहे. दुकानावर त्यांचे मेहूणे हेमंत पुरूषोत्तम पाटील रा.गुरूकुल सोसासटी जळगाव हे देखील काम पाहतात. सोबत वेटर हर्षद पटेल आणि विज नावाचे कामगार हे त्यांना मदत करतात. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे.
गुरूवारी ३ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धुकडू सपकाळे (पुर्ण नाव माहिती नाही) हा हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पहायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार दुकानातील माणसांनी त्यांनी सीसीटीव्ही दाखवत होते. त्यावेळी महेश मोरे हे दुकानावर आल्याने त्यांना सीसीटीव्ही फुटेज का दाखवत आहे असे त्यांच्या दुकानातील माणसांना ओरडले. दरम्यान याचा राग धुकडू सपकाळे याला आल्याने त्याने दुकानातील सर्वांना शिवीगाळ व मारहाण केली. आणि दुकानातील सर्व सामानांची तोडफोड करण्याची धमकी दिली. भांडणाचा आवाज आल्याने हेमंत पाटील हे दुकानावर आले असता धुडकू सपकाळे आणि सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने हेमंत पाटील यांना डोक्यावर मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याप्रकरणी महेश मोरे यांच्या फिर्यादीवरून रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात धुडकू सपकाळे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.