धक्कादायक : कर्जबाजारी झालेल्या तरूणाने केली अफूची लागवड; पोलीसांची धडक कारवाई

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्जबाजारी झालेल्या तरूणाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून चार बिघे शेतात अफूची लागवड केली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी कारवाई केली आहे.

 

शेतातील सततची नापीकीमुळे कर्जबाजारी झालेल्या तरूणाने चक्क शेतात चार बिघे अफूची लागवड केली आहे. प्रकाश सुदाम पाटील रा. वाकळी ता. चोपडा असे तरूणाचे नाव आहे. प्रकाश हा नापीकीमुळे कर्जबाजारी झाला होता. कमी वेळी जास्त पैसे कमविण्याचे वेगवेगळे अकलेचे तारे तोडू लागला. त्याने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अफूची लागवड कशी करावी याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्याने त्याच्या पाच बिघे शेतापैकी चार बिघे शेतात अफूची लागवड केली. विशेष म्हणजे कुणालाही समजू नये म्हणून शेतीच्या आजूबाजूला मक्याची देखील लागवड केली. दरम्यान अफूची लागवड केल्याची गोपनिय माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार डॉ. प्रविण मुंढे, चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या पोलीस पथकाने शेतात जावून धडक कारवाई केली. तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता आपण कर्जबाजारी झाल्यामुळे ही अफूची लागवड केल्याची माहिती दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कारवाई करण्याचे काम सुरू होते.

Protected Content