धुमस्टाईल मोबाईल लांबविणारे तिघे जेरबंद; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील संभाजी नगरात पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून १५ हजाराचा मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे. यात एक संशयित अल्पवयीन मुलगा आहे. तिघांवर भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शंकर भवानी तिवारी (वय-६०) रा. संभाजी  नगर भुसावळ हे नेहमीप्रमाणे २९ मे २०२१ रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास शहरातील जुना वरणगाव रोडवरील संभाजी नगर ते रामायण नगर दरम्यान रोडवर पायी जात हाते. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येवून शंकर तिवारी यांच्या हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून वरणगाव दिशेने पळून गेले होते. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना वरणगावातील सुंदरबन परिसातून बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे. यात सागर राकेश आढाळे (वय-१९), भुषण समाधान सपकाळे (वय-१९) दोन्ही रा. आंबेडकर नगर आणि तिसरा अल्पवयीन मुलगा आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरी कबुली दिली आहे. 

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि हरीष भोये, पोहेकॉ रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर, उमकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, इश्वर भालेराव, योगेश महाजन, सुभाष साबळे यांनी ही कारवाई केली.

 

Protected Content