मोठी बातमी : फर्निचर आणि वाशिंग सेंटर दुकानाला भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रूपयांच नुकसान झाल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या ७ बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा रा. शिवधाम मंदीर, जळगाव याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देऊळ, खुर्ची, कपाट आदि सामान बनविले जाते. त्यांच्याच बाजूला देवकिरण विलास पाटील रा. निवृत्ती नगर, जळगाव याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत विल्स फर्निचर दुकान आणि वाशिंग सेंटर मधील सामान जळून खाक झाले आहे. यात विल्स दुकानात असलेले सागवान लाकूड, मशिनरी व तयार वस्तू जळून अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाले तर वाशिंग सेंटर मधील कार वाशिंग मशिन, व्हक्यूम क्लीनअर मशिनी, कोटींग मशिन, फर्निचर आदी असा अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे एकुण ७ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. व आग विझविण्यात आली. दरम्यान याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content