कमल हसन यांच्या मक्कल निधी मैयम पक्षाचा इंडिया आघाडीत प्रवेश

चैन्नई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेते कमल हसन यांनी सहा वर्षापूर्वी मक्कल निधी मैयम (एमएनएम) या पक्षाची स्थापना केली होती. स्वबळावर दोन निवडणुकीत सामना केल्यानंतर कमल हसन यांनी तमिळनाडूतील द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी द्रमुकला पाठिंबा देणार आहे. कमल हसन यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाण्याची शक्यता होती, पण त्यांना पुढील वर्षासाठी राज्यसभेची एक जागा देऊ करण्यात आली आहे.

कमल हसन आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन या दोघांनीच याबाबत समझोता केल्याचे समजते. कमल हसन म्हणाले की ‘देशाच्या हितासाठी आम्ही द्रमुकसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून केवळ पदाचा मुद्दा हा आमच्यासाठी फारसा महत्त्वाचा नव्हता’ कमल हसन यांचा पक्ष आता द्रमुकच्या बाजूने तमिळनाडूतील ३९ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करणार असून पुद्दुच्चेरीमध्येही हे घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. द्रमुक हा तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष आहे त्यांचा काँग्रेससोबत जागा वाटपाचा तिढाही लवकरच सुटू शकतो. तमिळनाडूमध्ये काँग्रेसच्या वाट्याला दहा जागा येण्याची शक्यता आहे.

Protected Content